मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाविकास आघाडीत चर्चा झाल्यानुसार राज्यसभेची हि जागा शिवसेनेची होती. आणि त्यासाठी अट नसून शिवसेना पुरस्कृत उमेदवार व्हा अशी आमची भूमिका होती. आता विषयच संपला, असे खा. संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या समर्थकांना सुनावले आहे.
कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजेंनी शिवबंधन बांधण्यास नकार दिल्यानेच शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातूंच उमेदवार दिला असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खा. राऊत यांनी खेळी केली आहे. असा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला.
यावर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून झालेल्या चर्चा आणि विचारविनिमयानुसार हि जागा शिवसेनेची आहे. आणि यापूर्वी मोठ्या महाराजांनी शिवसेना, काँग्रेसमध्ये प्रवेश केला, खुद्द संभाजीराजेंनी राष्ट्रवादी भाजपकडून निवडणूक लढवून आमदार खासदार झाले आहेत. आहेत. त्यानुसार संभाजीराजेना राजकीय पक्षाचे वावडे नसावे. फक्त संभाजीराजेंनी शिवसेनेत यावे आणि शिवसेना कोट्यातून निवडणूक लढवावी अशी आमची सन्मानात्मक भावना होती. त्यानुसारच आम्ही शिवसेनेची ४२ मते देणार होतो, पण आता विषयच संपला असे म्हणत मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपतींचे समर्थकांना त्याचा दगाफटका झाल्याचा आरोप फेटाळत खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.