मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपची छुपी युती असल्याचा आरोप करत आगामी निवडणुकांचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे एकनाथराव खडसे यांनी सांगितले
मुख्यमंत्री जिथे निवडणुकीस उभे राहतील तिथे त्यांच्या विरोधात उभे राहण्याची भाषा नवनीत राणा यांनी केली असल्याच्या पार्श्वभूमीवर “त्या स्वतःच्या ताकदीने नव्हे तर शरद पवार आणि राष्ट्रवादीचा टेकू घेऊन घेऊन निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे अगोदर स्वतःची ताकद निर्माण करा मगच मुख्यमंत्री यांना आव्हान देण्याची भाषा करा.” असा सल्ला माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यांना दिला आहे.
यासोबतच पुढे बोलताना आगामी काळात जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या किवा पंचायत समितीच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवायच्या कि महाविकास आघाडीने एकत्र लढवायच्या हा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार असून त्यानुसार पावले उचलले जातील असे खडसे यांनी सांगितले.
हे सांगतानाच बोदवड नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सर्व वेगळे होते. मात्र भाजप आणि शिवसेनेची छुपी युती होती. भाजपाचा शिवनेला संपूर्ण पाठिंबा दिला होता असे सांगत जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेची छुपी युती असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधींशी संवाद साधतांना केला आहे.
व्हिडीओ लिंक :
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1134539657399999