गोदावरी स्कूलमध्ये शिवजयंतीचा जल्लोष

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल शाळेमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. इयत्ता ७ वीचे विद्यार्थी श्रावणी पाचपांडे, विवेक पाटील यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांच्या जीवनाची गौरवगाथा प्रस्तुत केली.

इयत्ता ५वीचा विद्यार्थी हिमांशू महाजन याने शिवाजी महाराजांची शौर्यगाथा गायली. गोदावरी स्कूलचा विद्यार्थी व डान्स इंडिया डान्स मधील विजेता डान्स मास्टर दिवेश भदवेलकर याने शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथावर नृत्य सादर केले. यावेळी स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते .

Protected Content