अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यातील शिरूड येथिल नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे बोगस झाले असून तात्काळ पंचनामे करा, अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.
महिला तलाठी यांचे पती यांनी सदर पिकांची थेट शेतात जाऊन पाहणी केली असता परिसरातील शेतकरी त्यांच्या सोबत होते. याबाबत शेतकऱ्यांनी शेतात पिकांचे काय नुकसान झाले ते सांगून, समक्ष पंचनामे करण्यात आले.
काही दिवसांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली असता. नुकसाग्रस्त शेतकऱ्यांची नावे त्या यादीत आढळून आली नाही व तलाठी यांनी ती यादी बाहेर सुद्दा फलकला लावली नाही.
या बाबत तलाठी यांना विचारना केली असता. या बाबतचे मला काहीच माहीत नाही असे उडवाउडवीची उत्तरे शेतकर्यांनी देण्यात आली. याबाबत सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेताचा फोटो काढून अर्ज तयार करून तलाठी, कृषी अधीकारी, तहसीलदार यांच्या पर्यंत पोहचवले. मााञ, या बाबत अध्यापही कुठलाही तोडगा निघालेला नाही.
कोतवालाच शेताचा खोटा पंचनामात्याच शिवारातील कोतवालाच्या शेतात मक्याचे पीक नसताना यांचे नाव त्या यादीत दिसून आले. धक्कादायक प्रकार म्हणजे कोतवाल यांच्या शेतात मक्याचे पीक नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले व कोतवालाच्या शेतात मक्याचे पीक आले कुठून व नुकसान ग्रस्त यादी मध्ये त्यांचे नाव कसे काय? शेतकऱ्यांना डावलून कोतवालाचा शेताचा खोटा पंचनामा करत त्याचे नाव नुकसानग्रस्तांच्या यादीत समाविष्ट झालेच कसे? या बाबतचा प्रश्न आज उभा आहे. गावातून ओरड उठली असून आरोप गावातील शेतकऱ्यांनी केला आहे.
आरोप करते शेतकरी बाळू पाटील, भास्कर पाटील, पिंटू पाटील सह अन्य शेतकरी आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्यांची नावे गेली कुठे तसेच खोट्या पंचनाम्या बाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.