धुळे प्रतिनिधी । शिरपूर जवळील वाघाडी येथील केमिकल फॅक्टरीला सकाळी 10 वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागून बॉयलरचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटात सात जणांचा होरपळून मृत्यू तर स्फोटात 30 जण भाजले गेल्याची घटना. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती मिळतेय.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच प्रशासन अधिकारी प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी आपल्या फौजफाटा सहित धाव घेतली असून परिस्थितीची पाहणी करत आहेत. बॉयलरचा स्फोट इतका भीषण होता कि, शिरपूर शहरासह परिसरातील ८ ते १० किलोमीटर अंतरावरील गावांना आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान आगीतून आतापर्यंत दहा मृतदेह व 22 गंभीर जखमी ना बाहेर काढण्यास यश आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून पन्नास हून अधिक कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे, जखमींवर शिरपूर येथील शासकीय रुग्णायलयात उपचार सुरु आहेत, बॉयलर सतत पेट घेत असल्यामुळे आग विझविण्याच्या मदत कार्यात अडथळा निर्माण होत आहे. फॅक्टरीत सहा बॉयलर असून आतापर्यंत ४ बॉयलरचे स्फोट झाले आहेत आणखी स्फोट होत आहेत सुरक्षेच्या कारणाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहेत
शस्पोर्ट झाल्यानंतर वरिष्ठ पोलिसांनी पोलीस ताफ्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे नेमका हा स्पोर्ट कुठल्या कारणामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही याचा शोध पोलिस कर्मचारी घेत आहे. केमिकल कंपनीत मोठा स्फोट होऊन आगीचे लोळ आकाशात उडताना दिसत होते काढा धुरांचे लोड तब्बल 20 फुटांपर्यंत उंच असल्यामुळे मदत कार्य करण्यास अडचण निर्माण होत आहे तर आग विझवण्यासाठी परिसरातील जवळपास असलेल्या अग्निशमन बंब आला बंब आणण्यात आला तर जखमी झालेल्या कामगारांना तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या फॅक्टरीत जवळपास शंभर कामगार काम करत असल्याची माहिती मिळाली.