महायुतीच्या मेळाव्यास उपस्थिती द्या : आ. चौधरी


अमळनेर प्रतिनिधी । महायुतीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित अमळनेर विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या मेळाव्यात सर्वांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी केले आहे.

या मेळाव्यास ना. गिरीश महाजन, ना गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री सुरेशदादा जैन आदी प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर शेजारी प्रताप मिल कंपाऊंड येथे दिनांक १० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. तरी या प्रसंगी अमळनेर विधानसभा मतदार संघातील कृ.उ.बा समिती संचालक, नगरसेवक, नगरसेविका, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासो चेअरमन, संचालक,महायुतीतील सर्व पक्षाचे आजी माजी पदाधिकारी ,आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराचे सर्व सदस्य, विविध क्षेत्रातील पदाधिकारी व सर्व नागरीकांनी आवर्जून उपस्थित राहून महायुतीचे उमेदवार आ उन्मेष पाटील यांचे हात बळकट करावे असे आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content