चाळीसगाव (प्रतिनिधी)। गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यातील शिरसगाव ते तळोद ही बस सुरू करण्याची मागणी नागरीकांसह विद्यार्थ्यांची होती. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने चाळीसगाव आगारप्रमुखांना याबाबत निवेदन देण्यात आले होते. जळगाव विभागाने या निवेदनाची दखल घेत लवकरच मंजूरी मिळणार असल्याची सांगण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव तळोदे या दरम्यानच्या गावातील विद्यार्थ्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून बस सेवा नसल्याने शाळेत जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने 29 जानेवारी रोजी चाळीसगाव बसआगार प्रमुखांना बससेवा सुरू करण्याबाबत विनंतींचे निवेदन देण्यात आले होते. दिलेल्या निेवेदनाची दखल घेत राज्य परीवहन महामंडळाचे जळगाव विभागाचे वाहतूक निरीक्षक (प्रशिक्षण) एस.ए.सातपुते, चाळीसगाव आगारप्रमुख संदीप निकम यांनी बस सेवा सुरू करण्यासंदर्भात नांद्रे-काकडणे येथील रस्त्याची पाहणी करून विद्यार्थ्यांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून बससेवा लवकरच सुरू करण्याचे आश्वासने यावेळी दिल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यज्ञेश बाविस्कार यांनी दिली आहे.