मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे शिंदे सरकारचा विस्तार झाला असतांना ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.
उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांनी एकमेकांवर विविध याचिका दाखल केल्या असून याची सुप्रीम कोर्टात एकत्रीत सुनावणी सुरू आहे. आधी ही सुनावणी १२ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. यानंतर आज ही सुनावणी २२ ऑगस्टपर्यंत लांबणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेनेला पक्षावर ताबा दाखविण्यासाठी पुरावे सादर करण्यासाठी आजच चार आठवड्यांची मुदत दिलेली आहे. तथापि, सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याचे आता दिसून येत आहे.