फैजपूर प्रतिनिधी । येथील तापी परिसर विद्यामंडळ संचलित शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन (दि. 21 जून) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी, प्राध्यापक व्ही.आर. तायडे यांनी उपस्थित विद्यार्थीनी शिक्षिका व प्राध्यापक तसेच कर्मचारी यांना योगाचे धडे दिले. वेगवेगळे आसन, प्राणायाम केल्याने काय फायदा होतो. याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्राचार्य डॉ. पिंगला धांडे, प्रा.डॉ. शशिकला मगरे-महाजन, प्रा. स्वाती तायडे, प्रा. यु.आर. पाटील यांच्यासह प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी शिक्षिकांनी सहभाग घेतला.