Home क्रीडा शिखर धवन आऊट मयांक अग्रवाल इन

शिखर धवन आऊट मयांक अग्रवाल इन

0
25

mayank agarwal

नवी दिल्ली वृत्तसंस्था । वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन याला वगळण्यात आले असून त्याच्या जागी मयांक अग्रवालला संधी देण्यात आली आहे.

येत्या १५ डिसेंबरपासून ही एकदिवसीय मालिका सुरू होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी बुधवारी संघातील बदलांची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवड समिती सदस्यांनी दुखापतग्रस्त शिखर धवनला आणखी काही दिवस विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी मयांकचा अंतिम १५ जणांच्या चमूत समावेश करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound