‘इस्त्रो’ आज करणार सॅटलाइट रिसॅट-२ बीआर१चे प्रक्षेपण

ISRO

मुंबई वृत्तसंस्था । भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचे (पीएसएलव्ही सी ४८) बुधवारी अर्धशतक साजरे होणार आहे. बुधवारच्या प्रक्षेपणामधून रडारचा समावेश असणाऱ्या ‘रिसॅट-२ बीआर १’ (RISAT-2BR1) या भारतीय उपग्रहासह इस्रायल, इटली, जपान आणि अमेरिका या देशांच्या एकूण नऊ उपग्रहांनाही अवकाशात पाठवण्यात येईल. आज (दि.११) दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण होणार आहे.

रिसॅट-२ बीआर १ हा रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाइट आहे. या उपग्रहाचे वजन ६२८ किलो आहे. रिसॅट-२ मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे. रिसॅट-२ ची जागा घेण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या रिसॅट-२ उपग्रहाचे प्रक्षेपण झाले होते. रिसॅट उपग्रहांची मालिका असून प्रामुख्याने हेरगिरीसाठी या उपग्रहांचा उपयोग करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच इस्रोने कार्टोसॅट-३ या अर्थ इमेजिंग सॅटेलाइटचे प्रक्षेपण केले होते. रिसॅट-२ बीआर १ या उपग्रहासोबत इस्रोने अन्य देशांच्या आणखी नऊ उपग्रहांचे प्रक्षेपण केले. यातले सहा उपग्रह अमेरिकेचे तर, इस्रायल, इटली आणि जापानचा प्रत्येकी एक उपग्रह आहे. चांद्रयान-२ ही यंदाच्या वर्षातील इस्रोची सर्वात मोठी महत्वकांक्षी मोहिम होती. त्यात विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगचे अपयश वगळता ही मोहीम यशस्वी ठरली. गगनयान ही इस्रोची पुढची महत्वाची मोहिम आहे. या मिशनतंर्गत तीन भारतीयांना अवकाशात पाठवण्याचे इस्रोचे लक्ष्य आहे.

Protected Content