शेवगे बु।। येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील शेवगे बु. येथे विविध विकास कामांचे थाटात भूमिपूजन आ.अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदारांचे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले,यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 10 लक्ष निधीतून गावात विद्युतीकरण करणे आणि खुल्या भूखंडात 30 लक्ष निधीतून समाज मंदिर उभारणे या विकास कामांचे भूमिपूजन आ.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदारांनी इतर आवश्यक ती विकासकामे मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

यावेळी सरपंचभीकुबाई देशमुख, ग्राम.प सदस्य दयाराम पाटील, भुषण पाटील, माजी सरपंच गोकुळ पाटील,कॉन्ट्रॅक्टर चेतन बोरसे,हरिचंद्र पाटील, अशोक पाटील, अनिल पाटील, अशोक पाटील, मनोज पाटील, रोहिदास पाटिल, राजू पाटिल, ए.बी नाना अमोल पाटील, कपिल पाटिल, कल्पेश पाटिल, प्रशांत पाटिल, सचिन पाटिल, बालकृष्ण पाटिल, अमोल पाटील तसेच सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोदर्डे-वंजारी गावलाही दिली सदिच्छा भेट
शेवगे येथे जाताना आमदार अनिल पाटील यांनी बोदर्डे-वंजारी ग्रुप ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट दिली,सरपंच, उपसरपंच आणि ग्रा प सदस्यांसह ग्रामस्थांनी आमदारांचे स्वागत केले. यावेळी आमदारांनी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांकडून गावातील समस्या जाणून घेत विकास कामाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी आमदारांच्या हस्ते गावातील भगवान विठ्ठल रुख्मिनी मंदिरात आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर सभामंडपात ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत तेथूनच अधिकारी वर्गास फोन लावून सर्व समस्या जागेवरच सोडविल्या, त्याबद्दल सर्वांनी आमदारांचे आभार व्यक्त केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.