शेतकरी दाम्पत्याची घरात गळफास घेवून आत्महत्या

dampatya

अमळनेर प्रतिनिधी । शेतात सततची नापीकी आणि कर्जबाजारीपुणामुळे अमळनेर तालुक्यातील पिळोदे येथील पती-पत्नीने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास उघडकीस घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील पिळोदे येथील लोटन रामराव पवार (वय-35) व सुनीता लोटन पवार (वय-33) या शेतकरी दाम्पत्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे बुधवारी दुपारी 2 वाजता राहत्या घरी गळफास घेतला. त्यांच्यावर राष्ट्रीयकृत बँक, पीक विकास सोसायटी आणि खाजगी सावकाराचे कर्ज होते. त्याच्याकडे आठ बिघे जमीन होती, दोन वर्षापासून सततच्या नापिकीमुळे ते अधिक कर्जबाजारी झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत, मोठा मुलगा आठवीला तर लहान मुलगा चौथीला आहे. वयोवृध्द आई व दोन विधवा बहिणीची जबाबदारी लोटन पवार यांच्यावर होती. अमळनेर ग्रामीण रुग्णलयात डॉ. जी. एम. पाटील आणि डॉ. दिलीप व्यवहारे यांनी शवविच्छेदन केले.

Protected Content