भुसावळ प्रतिनिधी । शेळगाव बँरेजसाठी अंजाळे गावातील शेतकरी बांधवाची शेतजमीन पाटबंधारे विभागाने संपादित केली आहे. तसेच या शेतजमीनीचा योग्य तो मोबदला लवकरात लवकर मिळावा, याबाबत आज (दि.6 जुलै) रोजी निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी मागणीसाठी अंजाळे गावातील शेतकरी बांधवानी अंजाळे भाजपा अध्यक्ष कैलास सपकाळे, उपसरपंच धनराज सपकाळे, ग्रा.पं.सदस्य योगेश सांळुखे यांच्यासह भालोद येथे माननिय आमदार हरिभाऊ जावळे यांची भेट घेतली व माननिय आमदार हरिभाऊ जावळे यांनी फैजपुर प्रांतधिकारी साहेब यांना आज शेतकरी बांधव यांच्याशी चर्चा करुन लवकरात लवकर शेतजमीनीचा मोबदला देण्याची सुचना केली आहे.