हिंगोणा परीसरात शेती मशागतीच्या कामांना वेग

Mashagat

यावल(प्रतिनिधी)। येथिल परिसरात रब्बी उन्हाळी हंगाम आटोपून आता शेतकरी वर्ग मशागतीच्या पूर्व तयारी कामाला वेग आला असून सारा शेतशिवारात शेती मशागती कामामुळे गजबजू लागला आहे. शेतकरी वर्ग शेतात ट्रक्टरने नांगरणी ‘रोटोव्हीटर आदी तंत्रज्ञानाव्दारे विकसीत करण्यात आलेल्या यंत्रणेच्या सहाय्याने शेतमजुरा बरोबर शेतातील काडीकचरा निरूपयोगी, गवत काटेरी झुडपे आदी काढणी, शेतात शेणखत, टाकणे अशी कामे मोठया प्रमाणात सुरू आहेत.

एकीकडे वैशाख वणव्यात लग्नसोहळ्याची मोठी धूम उडत असतांना वेळाता वेळ काढून परिसरातील शेतकरी बांधव हे शेतातील कामे आटोपती घेत आहे. लग्नसराईतचे गोंधळ व कडक उन्हामुळे मोठी अडचणीला बळीराजा हे सक्षमपणे समोरे जात आहे. शेती कामांची लगबग व लग्न सराई चालु असल्यामुळे मजूर वर्ग तसे कमीच मिळत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहे, मिळणारे मजुर वर्ग शेतातिल कामे उधड्या भावाने मागत आहे व घेतलेली कामे मजूर वर्ग भल्या पहाटे मजूर टोली आटोपती घेत आहे.

या कामाच्या घाईत पुढील पेणाऱ्या पावसाळयाच्या चार महिन्यांकरीता गुरांसाठी चारा, गहू, हरबरा मका ज्वारी यांची चाराची कुंटटी पाडून घरी व शेतात ढोरगोठयात भरून ठेवत आहे,सदर खरीप हंगाम एक महीन्यावर आल्याने सर्वच कामे डोक्यावर आल्यामुळे मजुर लवकर मिळेना व शेतातिल कामे संपेना असे झाले आहे. कामे जास्त मुजूर कमी व वेळ कमी असल्यामुळे सर्वच कामाची गरबड घाई होत असल्यामुळे शेतकरी वर्गावर आर्थिक बोजासह ताण वाढला आहे. ट्रकर व्यावसायिकांना गेल्या महीन्याभरापासून शेतातील मोठे कामे, उपलब्ध झाल्याने ट्रॅक्टर व्यवसायिकांना सुगीचे दिवस असल्याने ट्रॅक्टर व्यावसायिक वेगाने शेती कामास लागले आहे.

Add Comment

Protected Content