शेतावरील बांधावर वृक्षारोपण करून ग्रा.पं.सदस्यांनी दिला पर्यावरणाचा संदेश

yawal news

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोळवद ग्रामपंचायत सदस्य प्रगतीशील शेतकरी रमेश खुशाल पाटील यांनी आपल्या कोळवद शिवारातील शेतावरील बांधावर विविध जातींच्या वृक्षांची लागवड केली.

यावल तालुक्यात मागील काही दिवसातशेती बांधावर असलेली मोठमोठी ढेरेदारवृक्षांना आग लावुन जाळुन पाडण्याच्या घटना घडल्या असतांना कोळवद येथील शेतकरी रमेश पाटील मात्र या प्रकाराला अपवाद ठरले. श्री. पाटील यांनी सामाजीक बांधीलकीच्या माध्यमातुन पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीकोणातुन एक पाऊल पुढे जावुन आपल्या शेतावरील बांधावर विविध वृक्षांची लागवड केली आहे, रमेश पाटील यांनी केलेल्या या कार्याचा इतर शेतकरी बांधवांनी देखील आदर्श घेवुन अनुकरण करावे, अशी अपेक्षा आपण शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.

Protected Content