Home क्राईम शेतातील पाईप चोरणाऱ्या दोन चोरांना अटक

शेतातील पाईप चोरणाऱ्या दोन चोरांना अटक

0
48

raver

रावेर प्रतिनिधी । येथील शेतक-यांचे शेतीसाठी लागणा-या वस्तूची अनेक दिवसांपासून चोरी होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. मात्र अखेर त्या चोरांना अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे.

या बाबत वृत्त असे की, अशोक दशरथ नेमाडे यांच्या शेतातून प्लास्टिक पाईप चोरीला गेले होते. याबाबत त्यांनी रावेर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पो.नि. रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली हे.कॉ. जितू पाटील, हे.कॉ. सतीश सानप यांनी तपासाचे चक्र फिरवुन कुसुंबा येथून आरोपी निसार तडवी व नबाब तडवी यांना ताब्यात घेतले असून आरोपींकडून चोरलेले प्लास्टिक पाईप जप्त करण्यात आले आहे. तसेच पुढील तपास रावेर पोलिस करीत आहे.


Protected Content

Play sound