शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । शेंदूर्णी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी व अभियंता विठ्ठल पाटील यांनी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत गरुड महाविद्यालयातील विविध पर्यावरण उपक्रमांना भेट देऊन पाहणी केली.
मुख्याधिकारी साजिद पिंजारी व अभियंता विठ्ठल पाटील यांनी वॉटर हार्वेस्टिंग, शेंद्रिय अमृत पाणी प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प,नो व्हेईकल डे, वृक्षसंगोपन दत्तक योजना , याची माहिती जाणून घेतली. तसेच नगर पंचायत च्या जैविक घन कचरा विघटन करण्यासाठी अमृतकल्चर ची विशेष माहिती घेऊन मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या भेटीप्रसंगी संस्थेच्या कार्यकारी मंडळाने महाविद्यालयात या योजना राबविण्यासाठी दिलेल्या सहयोगाचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच त्यांनी नॅक मानांकनासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अतिथींचे स्वागत पर्यावरण पूरक पिशवी, संस्थेचे कॅलेंडर आणि स्मृतिचिन्ह देऊन प्राचार्य डॉ वासुदेव आर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ श्याम साळुंखे यांनी केले. याप्रसंगी डॉ संजय भोळे,डॉ प्रशांत देशमुख,मुख्य लिपिक हितेंद्र गरुड , डॉ अजिनाथ जिवरग आदी उपस्थित होते.