शेगाव येथे गुरुपौर्णिमानिमित्ताने भाविकांची मांदियाळी (व्हिडीओ)

shegaon

बुलढाणा प्रतिनिधी । गुरुपौर्णिमानिमित्ताने शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

आज गुरुपौर्णिमानिमित्ताने आज संतनगरी दुमदुमून गेली होती. येथील संत गजानन महाराजाची विदर्भातील पंढरी म्हणून ओळख आहे. महाराजांचे दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आपली इच्छा गजानन महाराजांकडे प्रकट करतात. गजानन महाराजांना आपला गुरु मानून त्यांचा आशीर्वाद घेण्‍यासाठी भाविक शेगावला येत असतात. यामुळे संतनगरी शेगावला भक्तिमय असे स्वरूप येऊन भाविकांची मांदीयाळी निर्माण होतेय. अशाच प्रकारच्या परिसरातील पायी दिंडी गुरुपौर्णिमाच्या दिवशी शेगावात दाखल होतात. संपूर्ण देशभर साजरा होत असलेला गुरू पौर्णिमा उत्सव हा एक अलौकिक क्षण असून गुरूला फार महत्व असल्याने शेगावला पायी वारी कर-यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळते.

जगाच्या कल्याण संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच एक. शेगाव येथे त्यांचे समाधी मंदिर आहे. श्री गजानन महाराज दिगंबर वृत्तीचे सिद्ध कोटीचे साधू होते. मिळेल ते खाणे, मिळेल त्या जागी राहणे, नेहमी भ्रमण करणे अशी त्यांची नित्याचीच दिनचर्या होती. त्यांच्या मुखात परमेश्वराचेच नामस्मरण, भजन असायचे. भक्तांची संकटे दूर करून त्यांना परमेश्वराचे दर्शन घडवून देण्याचे शेकडो उदाहरणे त्यांच्या चरित्रात सामील आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थानांमध्ये गणले जाणारे शेगावस्थितील गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविक गर्दी करतात. या उत्सवाचे आढावा थेट शेगाव हुन (अमोल सराफ, प्रतिनिधी, शेगाव बुलढाणा)

Protected Content