जळगाव प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील शेळगाव बॅरेजचे काम करण्यासाठी आलेल्या परप्रांतीय मजूराचा काम करतांना झालेल्या अपघातात मृत्यू झाला. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिका मधूमंगळ यादव (वय-35) रा. बिहार, ह.मु. शेळगाव हा हातमजूरीच्या कामासाठी गेल्या डिसेंबर 2018 पासून कामाला होता. शेळगाव बॅरेजच्या कामासाठी कामगार परप्रांतीय भागातूनच काम करण्यासाठी आलेले आहे. आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास सिमेंटचे ब्लॉक क्रेनने वर उचलण्याचे काम सुरू होते. या ब्लॉकला बेल्टला बांधण्यात आले होत. यावेळी बेल्टचा स्क्रु निघाल्याने ब्लॉकचा झटका भिका यादव यांच्या छातीला लागला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.