मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्यातून आपल्या प्रचार दौऱ्याला मंगळवारपासून सुरुवात केली असून आज सकाळी ११ वाजता मुंब्रा, ठाणे येथे शरद पवार यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीतर्फे देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उद्या शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी बिद्री, राधानगरी, कोल्हापूर येथे जाहीर सभा होणार आहेत, असे देखील राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोकणातील चिपळूण मतदारसंघात शेखर निकम, मुरबाड मतदारसंघात प्रमोद हिंदुराव, अंमळनेर मतदारसंघात अनिल भायदास पाटील, चोपडा मतदारसंघात जगदीश वळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात आले.