शरद पवार गटाने शहरातील विविध समस्यांबाबत मनपा आयुक्तांना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील विविध नागरी समस्यांबाबत आज १२ जून रोजी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यापासून पाणी पुरवठा विस्कळीत झालेला असून जळगाव शहर मनपाने राज्य शासनाने व केंद्र शासनाने कार्यान्वीत केलेली अमृत योजनेमार्फत मिळणारे पाणी अजूनही पुर्णवेळी व पुर्ण दाबाने मिळत नसून अवेळी व विस्कळीत पणे मिळते शहरातील बहुसंख्य भागातील नागरिकांना नवीन नळ संयोजन देण्यास मनपा अयशस्वी झाली आहे.

जळगाव शहरातील स्वच्छतेबाबतही नागरीकांच्या तक्रारी वाढल्या असून शहरातील स्वच्छतेचा मक्ता खाजगी ठेकेदारांना दिला असून शहरातील रस्ते, गटारी, सार्वजनिक शौचालये इ. चा ठेका दिला असल्याने मक्तेदार व आरोग्य विभागातील अधिकारी फक्त स्वच्छता न करता खोटी बिले काढण्यास स्वारस्य दाखवत असून शहरातील नागरीकांचे यामुळे त्रस्त झाले आहे. म.न.पा जळगाव शहर मनपा हद्दीत असलेल्या पथदिव्याबाबत ही नागरीकांच्या तक्रारी असून पथदिवे बसवणाऱ्या मक्तेदाराने गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून दिवे बसविणे व दुरूस्ती काम थांबविल्याने शहरातील बहुसंख्येने दिवे बंद आहेत. या समस्यांवर मनपा अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि नागरिकांच्या समस्या सोडव्याव्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Protected Content