भंडारा-लाईव्ह ट्रेंड न्युज वृत्तसेवा | तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा निकाल १३ मे रोजी सोमवारी घोषित झाला आहे. या निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संयुक्त बळीराजा जनहित पॅनलने विजय मिळवला आहे. तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांचे एकूण १० संचालक निवडणून आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे तीन तर, भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जय किसान महाविकास पॅनलचे चार आणि अपक्ष एक असे 18 संचालक निवडून आले आहेत. विदर्भातील प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या तुमसर- मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका मागील अडीच वर्षापासून होत नव्हत्या. उच्च न्यायालयाने तीन महिन्यात बाजार समितीची निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही निवडणूक पार पाडली. अखेर आज तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये शरद पवार गट आणि भाजपने चमकदार कामगिरी केली आहे.
तुमसर कृषी उत्तन्न बाजार समितीत शरद पवार गट- भाजपच्या संयुक्त पॅनलचा विजय
7 months ago
No Comments