जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार असतांनाही जळगाव शहरातील कोळी पेठेतील मन्यार वाडा येथील राहत्या घरातून गुन्हेगाराला आज शनिपेठ पोलिसांनी अटक केली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या आदेशानुसार शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक बळीराम हिरे, पोलीस उपनिरिक्षक सुरेश सपकाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल परीस जाधव, पोलीस नाईक किरण वानखेडे, विजय निकम, राहूल घेटे, राहूल पाटील यांच्या पथकातर्फे बुधवार १ सप्टेबर ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे वय २३ रा. मन्यारवाडा कोळीपेठ हा हद्दपार आरोपी कोळी पेठेतील मन्यारवाडा येथे मिळून आला. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ कुठलीही परवानगी नसल्याचे चौकशीत मिळून आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहूल घेटे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी आकाश उर्फ धडकन याला याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरु आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.