जळगाव प्रतिनिधी । शनीपेठ हद्दीतील वेगवेगळ्या भागातून दुचाकींची चोरी करणारे दोन संशयितांना काल मंगळवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. आज न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सविस्तर माहिती अशी की, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकींची चोरी बांडुक गँगचा प्रमुख शुभम शिवरात मिस्तरी (वय-२०) रा. वाल्मिक नगर हा करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर आंभोरे, अश्रु शेख, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहूल पाटील, वसंत लिंगायत, उमेशगिरी गोसावी यांनी कलावसंत नगर येथे रेल्वेगेट कडे जाणाऱ्या रोडवर संशयित आरोपी शुभम मिस्तरी आणि राहुल रविंद्र कोळी (वय-१९) रा. मेस्कोमाता नगर यांना ताब्यात घेतले. दोघांकडून तीन चोरीच्या दुचाक्या हस्तगत केल्या आहेत. आज न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.