जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील गोदावरी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे प्रख्यात वक्त्या व विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर अभ्यास असणाऱ्या शांभवी थेटे यांनी मार्गदर्शन केले.
सुमारे दोन वर्षापूर्वी जे एन यु विद्यापीठांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला आंदोलन करून अवघ्या देशपातळीवर गाजलेल्या व अतिशय अभ्यासू व निडर व्यक्तिमत्व असलेल्या शांभवी यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील संधी व परदेशातील नोकरीच्या संधी याविषयी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. आपल्या शिक्षणाचा उपयोग हा देशाच्या आर्थिक सामाजिक व सार्वभौम विकासासाठी झाला पाहिजे असे परखड मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. राष्ट्राचे हित पाहणे हे कुठल्या एका व्यक्तीचे समूहाचे अथवा धर्माचे काम नसून प्रत्येक भारतीयाचे ते मूलभूत कर्तव्य आहे असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ केतकीताई पाटील होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर गोदावरी आय एम आर चे संचालक डॉ. प्रशांत वारके, एसएनडीटी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलिमा वारके व इतर प्राध्यापक वृंद तसेच सुमारे २०० हून अधिक विद्यार्थी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.