धुळे , प्रतिनिधी| येथील धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटीच्या वतीने नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील कलाध्यापकांना आदर्श कलाध्यापक पुरस्कार २०१९ प्रदान करण्यात आला.
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी प्रा. आर. ओ. निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलीटेक्नीकल) येथे धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटीच्यावतीने आदर्श कलाध्यापक पुरस्कार २६ कलाध्यापकांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पारोळा येथील गजानन विद्या मंदीरचे कलाध्यापक शामकांत प्रेमचंद वर्डीकर यांना त्यांच्या कला, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील केलेल्या मोलाचे कार्य पाहता ‘नाशिक विभागीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार २०१९’ प्रदान करण्यात आला. याप्रसंगी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष व चेअरमन प्रा. आर. ओ. निकम, सोसायटीचे अध्यक्ष राहुल पाटील, वरिष्ठ कलाध्यापक श्री. शेलकर, उपाध्यक्ष योगेश वाघ, चित्रकार विशाल निकम, श्री. पोपळे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सचिव शशीकांत पाटील, सहसचिव मोहन सूळे , सरचिटणीस संभाजी बोरसे आदींनी कामकाज पहिले.