जळगाव प्रतिनिधी । मनसेचे माजी पदाधिकारी शाम दीक्षित यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, या मागणीसाठी नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जळगाव पोलीस प्रशासन हाय…हाय आणि पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांची बदली झालीच पाहिजे, अशा घोषणा आंदोलक देत होते.
शहरातील देविदास कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळ शाम दीक्षित या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मोहितराज उर्फ मुन्ना अशोक कोळी (रा. सबजेल मागे ,जळगाव) , सनी उर्फ चाळीस वसंत पाटील (रा.रामेश्वर कॉलनी) या दोघांनी मिळून केला आहे. पोलीस दोघं संशयित आरोपींच्या मागावर आहेत.
दरम्यान, शाम दीक्षित यांच्या नातेवाईक आणि सामजिक कार्यकर्त्यांनी आज दुपारी एक वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले. घटनास्थळी आमदार राजूमामा भोळे हे आंदोलनस्थळी नातेवाईकांची समजूत काढली. परंतु आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पोलिसांनी समजूत घातली त्यांनंतर सर्व आंदोलक शांत झाले. यानंतर सर्व आंदोलक एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे रवाना झाले आहेत.