चोपडा प्रतिनिधी । येथील प्रकाश प्रोव्हिजनचे संचालक वालचंद जैन यांची धर्मपत्नी स्व. शकुंतलाबाई जैन यांचे दि. 23 ऑगस्ट रोजी रात्री 8:10 वाजता समाधी मरण झाले.
याबाबत माहिती अशी की, प.पू. संतशिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागर मुनीमहाराजांचे प्रेरणेते तसेच पारोळा येथे विराजमान प.पू. मुनींश्री 108 अक्षयसागर महाराज, प. पू. मुनींश्री 108 नेमीसागर महाराज, शुल्लकरत्न 105 समताभूषण महाराज यांच्या सानिध्यात दि 15 ऑगस्टला प्रथम मिथ्यात्वचे त्याग करून नंतर 2 प्रतिमा, घराचे त्याग, 3 प्रकारचे आहाराचे त्याग तसेच महाराजींचे दर्शन घेतल्यावर स्वतःच्या स्व इच्छेने त्यांनी श्रीफळ चढवून आजीवन व्रत घेतले. 3 जल उपवास झाल्यानंतर त्यांनी दि.18 ऑगस्ट रोजी परत विनंती करत चारही प्रकारचे आहार त्याग करून यम सुलेखनाला सुरुवात केली.
पारोळा येथील समाजाने खूप सहायता करून ह्या सुलेखनात त्यांनी अनमोल सहकार्य दिले. तसेच दि. 23 ऑगस्ट रोजी दिगवंदना करून त्यांची यम सुलेखनात ही सफल झाली, त्यामध्ये बारामतीचे प्रतिमाधारी सविता दिदी शहा व चोपड्याहुन आलेल्या श्रावकांनी 24 तासणमोकार जाप केले व आपले देखील समाधी मरण होवो अशी भावना केली. दि 24ऑगस्ट रोजी सकाळी 08:15 वाजता श्री विद्यासागर संत निवास मधून अंतिम यात्रा निघाली, जुन्या वैकुंठधाम समोरील शेतात त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. येथे सर्व समाजाने सिद्ध भक्ती, श्रुत भक्ती व शांती पाठ केले. समाजच्या वतीने राहुल रसिकलाल जैन यांनी श्रद्धांजली वाहून जीवनात परिवर्तन कसे करावे व समाधीकरीत असतांना नुसते देहाची नाही तर कर्माची निर्जरा करून समाधी साधायची असते. गुरूंचे तसेच जैन समाजाचे व समाधीमध्ये ज्यांनी-ज्यांनी सहकार्य केले. त्यांचे अनंत उपकार आमच्यावर झाले अशी भावना व्यक्त करण्यात आली.