पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या तसेच पोलिस कर्मचारी व त्यांच्या पाल्यांच्या न्याय व हक्कासाठी कार्यरत असलेल्या पोलिस बाईज असोसिएशनच्या जिल्हा अध्यक्षपदी पाचोरा येथील नदीम शकील शेख यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरची नियुक्ती पोलिस बाईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. नदीम शेख यांच्या मागील कामाचा आढावा घेत त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून यापुढे देखील सामाजिक कार्य तसेच पोलिस कर्मचारी व त्यांच्या पाल्यांच्या न्याय व हक्कासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे नदीम शेख यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. नदीम शेख यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.