पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले शकील शेख यांनी सलग १५ वर्ष उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल २६ जानेवारी गणराज्य दिनाच्या दिवशी शकील शेख यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महत्त्वाचे मानले जाणारे पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले.
शकील शेख यांना पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी उपस्थित होते. शकील शेख यांना मिळालेल्या या सन्माना निमित्त त्यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
