रायगड (वृत्तसंस्था) अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या एका विकृत शिक्षकाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, माणगाव तालुक्यातील फलाणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत नित्यानंद पाटील हा कार्यरत आहे. मागील 7 ते 8 महिन्यांपासून त्याचे विद्यार्थिनींशी विकृत चाळे सुरू होते.परंतू काही दिवसांपूर्वी शाळेत नव्याने रुजू झालेल्या शिक्षिकेला या विद्यार्थिनींनी हा प्रकार सांगितला. त्यानंतर याची माहिती पालक व ग्रामस्थांना मिळाली. पालकांनी या नराधम शिक्षकाविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.