अमळनेर प्रतिनिधी | अमळनेर येथील बोरी नदीपात्रात आज सकाळी पोलीस प्रशासन, महसूल व आरटीओ विभाग यांनी टेम्पो तसेच बैलगाडीच्या सहाय्याने वाळू चोरी करणाऱ्यांवर संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली.
अमळनेर येथील बोरी नदीपात्रात आज सकाळी पोलीस प्रशासन, महसूल व आरटीओ विभाग यांनी वाळू चोरी करणाऱ्यांवर संयुक्तरित्या कारवाई केली. बोरी नदीपात्रात टेम्पो तसेच बैल गाडी च्या सहाय्याने वाळू चोरी करणाऱ्यांना पकडून पोलीस बंदोबस्तात थेट तहसील कार्यालयात आणण्यात आले.
कारवाईत जप्त केलेल्या टेम्पो व बैल गाड्या धारकांवर वाळू चोरीचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, तहसीलदार मिलींदकुमार वाघ व आरटीओ आर.एम.निमसे यांच्या पथकाने केली आहे.
दरम्यान छोटे छोटे टेंपो किंवा बैलगाडीतून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांसोबतच वाळू चोरीतील मोठे मासे देखील कारवाईच्या जाळ्यात येतील काय? अशी कुजबुज शहरात सुरू होती.