Home क्राईम तामिळनाडूतील अपघातात भुसावळचे सात जण ठार

तामिळनाडूतील अपघातात भुसावळचे सात जण ठार

0
53
accident andhra pradesh

भुसावळ प्रतिनिधी । तामिळनाडूत झालेल्या रस्ता अपघातामुळे भुसावळ शहरातल्या देशमुख कुटुंबातील सहा जण व चालक जागीच ठार झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तामिळनाडूतल्या वेल्लोर जिल्ह्यातील अंबूर गावाजवळ कारचे चाक फुटल्याने ती कार समोरच्या ट्रेलरवर आदळली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये भुसावळ येथील मिलींद देशमुख, त्यांची पत्नी किरण देशमुख, मुले अजिंक्य व आदित्य आदींसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात त्यांच्या कारच्या चालकाचाही समावेश आहे.

मिलींद देशमुख हे भुसावळच्या रेल्वे सुरक्षा बलामध्ये कार्यरत असून ते स्वीफ्ट कार घेऊन बालाजी दर्शनाला गेले होते. पहिल्यांदा ते बंगळुरू येथील भावाकडे गेले होते. यानंतर ते बालाजी दर्शनाला जात होते. यातच रस्ता अपघातात त्यांच्यावर काळाने क्रूर झडप घातली. हा अपघात सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडला. यात त्यांच्या गाडीचा चालकदेखील ठार झाला आहे. यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound