जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणारी १८ वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर दोन वर्षांपासून अत्याचार करून गर्भवती केले नंतर गर्भपात करून लग्न करण्यास नकार दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १८ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एरंडोल शहरातील इस्लामपूरा भागात राहणारा हसन असलम मोमीन याची पिडीत मुलीशी ओळख झाली, त्यावेळी ती अल्पवयीन होती. ओळखीचा फायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिच्या इच्छेविरूध्द तिच्या अमानुष अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत तरूणी गर्भवती राहिली. पिडीत मुलगी गर्भवती राहिल्यानंतर संशयित आरोपी हसन असलम मोमीन, त्याची आई मुन्नी आणि असलम मोमीन या तिघांनी गर्भपात करण्यासाठी कॉफी आणि पपई खाऊ घातली. यामुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्याची तारीख निश्चीत केली. परंतू लग्नाच्या वेळी हजर झाले नाही व फसवणूक केली. हा प्रकार घडल्यानंतर तरूणीने रविवारी १२ मार्च रोजी रात्री ११ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी हसन असलम मोमीन, त्याची आई मुन्नी आणि असलम मोमीन या तिघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.