एकतर्फी प्रेमातून महिलेचा विनयभंग

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एका गावात राहणारी २२ वर्षीय महिलेचा एकाने एकतर्फी प्रेमातून पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यावल तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच गावात राहणारा नितीन सुरेश कोळी याने महिलेवर एकतर्फी प्रेमातून महिलेला पाठलाग केला. त्यानंतर १ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता तिचा रस्ता आडवून संशयित आरोपी नितीन कोळी याने सांगितले की, मी तुझ्यावर प्रेम करतो. तू माझ्यावर प्रेम व संबंध ठेव अशी सांगितले. याला महिलेने नकार दिल्याने तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी १२ मार्च रोजी रात्री उशीरा संशयित आरोपी नितीन सुरेश कोळी याच्यावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज शेख करीत आहे.

Protected Content