ज्येष्ठ पत्रकार शरदकुमार बन्सी कालवश

शेअर करा !

 

धरणगाव,  प्रतिनिधी । येथील ज्येष्ठ पत्रकार शरदकुमार बन्सी यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरातील इतिहासाचे साक्षीदार असणारे एक व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

शरदकुमार बन्सी यांचे आज निधन झाले. एक आदर्श शिक्षक आणि परखड पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. धरणगावातील विविध उपक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असे. काही दिवसांपासून आजाराने ग्रासल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांनाच त्यांनी आज शेवटचा श्‍वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शरदकुमार बन्सी यांच्या निधनामुळे धरणगाववर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाने शहरातील इतिहासाचे साक्षीदार असणारे एक व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!