बिहारची निवडणूक विकास व कायदा सुव्यवस्था यावर लढली जावी

खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली अपेक्षा

शेअर करा !

 

मुंबई,वृत्तसंस्था । शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी बिहारची निवडणूक ही विकास आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर लढली जावी. अशी अपेक्षा व्यक्त करत जर बिहार निवडणुकीत मुद्दे कमी असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील, असा खोचक सल्ला त्यांनी दिला आहे.

काल बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजला असून ही निवडणूक तीन टप्प्यात होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. यावर संजय राऊत बोलत होते. श्री. राऊत यांनी म्हटलं की, बिहारची निवडणूक ही विकास आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर लढली जावी. जर बिहार निवडणुकीत मुद्दे कमी असतील तर मुंबईहून पार्सल केले जाऊ शकतात. काल संजय राऊत यांनी बिहारमधील कोरोना संपला का असा प्रश्न विचारला होता. तसंच या निवडणुकीत सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा असावा यासाठी प्रयत्न केल्याची टीकाही त्यांनी केली होती.

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिला टप्प्यात 28 ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर तर तिसऱ्या टप्प्यात सात नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 10 नोव्हेंबर रोजी या मतदानाचा निकाल घोषित होणार आहे. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!