ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

सातारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या 90 वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथे निवासस्थानी आज १९ मे रोजी पहाटे निधन झाले आहे. प्रतापराव भोसले यांच्या पश्चात माजी आमदार मदन भोसले, मोहनराव भोसले, गजानन भोसले हे तीन सुपुत्र, विवाहित कन्या पद्मादेवी पाटील, सूना, नातवंडे, परतुंडे असा परिवार आहे. प्रतापराव भोसले हे वाई खंडाळा विधानसभेचे आमदार होते आणि राज्याचे कॅबीनेट मंत्रीही होते.

त्यानंतर त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार देखील झाले होते. १९९७ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून गेलेली सत्ता पुन्हा आणून महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन केले. अत्यंत सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न, विचारांची पक्की बैठक आणि स्वाभिमान जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. या कालावधीत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, देशभक्त आबासाहेब वीर यांच्या नेतृत्वाखाली काम करताना धोम, कण्हेर धरण, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, जनता शिक्षण संस्थेच्या उभारणीसह कृषी, सहकार क्षेत्रासह संस्थात्मक कामकाजात मोलाचे योगदान दिले.

Protected Content