बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी लाच घेणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला अटक

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बदली झालेल्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी १ लाख ८० हजारांची लाच स्विकारणाऱ्या जिल्हा परिषदमधील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपीक नरेंद्र किशोर खाचणे (वय ५२) याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवार २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे लोकसेवक असून ते यावल येथील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई पदावर कार्यरत आहे. त्यांची स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली होती. बदली ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी यातील नरेंद्र खाचणे यांनी २ लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार सापळा रचून बुधवार २१ रोजी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. तडजोडी अंती तक्रादाराकडून  १ लाख ८० हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content