Home क्राईम अडावदला दोन गटांमध्ये दंगल : गावात तणावपूर्ण शांतता

अडावदला दोन गटांमध्ये दंगल : गावात तणावपूर्ण शांतता

0
119

अडावद, ता. चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे प्रार्थनास्थळाजवळच्या रस्त्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याने वातावरण चिघळले असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.

अडावद गावात काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास प्रार्थनास्थळाजवळच्या एका रस्त्याच्या कामावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात दगड, विटा, लाकडी व लोखंडी दांडे यांचा वापर करण्यात आला. यामुळे परिसरात तणाव पसरला. दरम्यान, पोलिसांनी धाव घेतली, तसेच काही वेळात कमांडो पथक देखील दाखल झाल्यामुळे जमाव पांगला.

दरम्यान, या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी एका समुदायातील स्त्री-पुरूष रात्री उशीरापर्यंत अडावद पोलीस स्थानकाच्या परिसरात जमले होत्ो. मात्र पोलिसांनी त्यांना पांगवले. ताज्या वृत्तानुसार, गावातील वातावरण नियंत्रणात होते.


Protected Content

Play sound