मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा सेवा संघाच्या अंतर्गत येणाऱ्या तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सचिन रमेश पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष विलास पाटील यांनी अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा केली आहे.
सचिन पाटील हे गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेत तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे व उल्लेखनीय योगदानामुळे त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे मुक्ताईनगरसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून सचिन पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. पत्रकार मित्र, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन पाटील यांच्या पुढील काळातील कार्यावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली तानुबाई बिरजे पत्रकार परिषद नक्कीच नवीन उंची गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.