कनिष्ठ अभियंता संघटनेचे आत्मक्लेश आंदोलन

बुलढाणा प्रतिनिधी- खामगाव येथे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळच्या कनिष्ठ अभियता संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी शासकीय कामकाज आटोपल्या नंतर आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून कार्यालयातच राहून आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ तसेच इतरही कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले अभियंता यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे.या अंतर्गत आज सामूहिक स्वरूपात आपापल्या कार्यालयात कार्यालयीन कामकाज आटोपल्या नंतर कार्यालयातच रात्रभर थांबून आत्मक्लेश आंदोलनाची सुरुवात केली. यात मुख्यतः कंपल्सरी व्हेकन्सी  या मोडुल ला विरोध व हे रद्द करावा या सह प्रलंबित मागण्या आहे। या करता दुसऱ्या दिवशी कार्यालयीन कामकाज सुरू करण्यात येणा पर्यंत आज आत्मक्लेश आंदोलन कार्यलयात करत असल्याचे माहिती संघटनेचे  राजेश कायंदे यांनी  लाईव्ह ट्रेंड न्यूज शी बोलताना सांगितले

Protected Content