नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत दोन खेळाडूंची निवड

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी पहूर येथील इंदिराबाई ललवाणी विद्यालयाची पूनम देशमुख व पूर्वा सोनवणे या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन संलग्नित जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन द्वारा आयोजित जळगाव जिल्हा वरिष्ठ गट ॲथलेटिक्स अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा २०२४ आज २८ एप्रिल रविवार, सकाळी ८ वाजता एकलव्य क्रीडा संकुल,जळगाव येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची खेळाडू पूनम शाम देशमुख (४०० मीटर अडथळा शर्यत) – प्रथम क्रमांक तर कु.पूर्वा धनराज सोनवणे (लांब उडी)- द्वितीय क्रमांक स्थान प्राप्त करून या दोघांची १ ते ३ जून २०२४ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ७२ वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप, नागपूर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेप्रसंगी त्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे संचालक तथा जळगांव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव, उपाध्यक्ष डॉ.पी.आर. नाना चौधरी, कार्याध्यक्ष डॉ.विजय पाटील, सदस्य योगेश सोनवणे, सदस्य प्रा.समीर घोडेस्वार यांच्या हस्ते करण्यात आला. तर इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, मुख्याध्यापक एस.आर.चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन.चवरे, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, पर्यवेक्षक प्रा.के.डी.निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी.जी.अत्तरदे. यांनी अभिनंदन केले तर सर्व शिक्षक बंधू-भगिनी तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले. निवड झालेल्या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख जी.सी.पाटील तर उच्च माध्यमिक विभागाचे क्रीडाशिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांचे मार्गदर्शन लाभले. **

Protected Content