जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नुकताच झालेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या बैठकीत मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुरज विजयराव नारखेडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सर्वानुमते जळगाव जिल्हा जनसंपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. महासंघाच्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
सुरज नारखेडे यांची निवड ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या माहिती अधिकार कायदा महासंघ फेडरेशन महाराष्ट्रच्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत सर्वांनी श्री. नारखेडे यांच्या नावाला अनुमोदन देऊन त्यांची जळगाव जिल्हा जनसंपर्क प्रमुखपदी फेरनिवड केली. निवडीचे पत्र त्यांना मध्यरात्री त्यांच्या खासगी मेलवर प्राप्त झाले. महासंघाच्या वतीने त्यांना शुभेच्छा व अभिनंदनपर ठराव सुद्धा करण्यात आला.
या निवडीबद्दल बोलतांना महासंघाने सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील माहिती अधिकार कायदा महासंघ माहिती अधिकार २००५ च्या अंमलबजावणीत येणाऱ्या अनेक अडचणी व शासकीय कामात होणारी दिरंगाई यासारख्या समस्या सोडवण्यासाठी श्री. नारखेडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना शासकीय, निमशासकीय व विविध क्षेत्रातील अनेक अडचणींपासून वाचण्यासाठी मदत होईल. सुरज नारखेडे यांच्या निवडीमुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक वंचित घटकांना न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.