जळगाव प्रतिनिधी । राज्यस्तरीय निशाणेबाजी स्पर्धेसाठी जिल्हा संघात जळगाव जिल्हा रायफल शूटिंग असोसिएशनच्या ६ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
मुंबई येथे सुरू असलेल्या स्पर्धेत प्रियंका पटाईत, रोहित विसपुते, अनंत शिंदे, हेमंत मांडोळे, गणेश मांडोळे, जुनेज रंगरेज या सहा खेळाडूंची निवड झालेली आहे. जिल्हा रायफल असोसिएशनचे अध्यक्ष बिशन मिलवाणी यांच्या मार्गदर्शनात खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या सहा खेळाडूंचे प्रशिक्षक दिलीप गवळी, प्रा. यशवंत सैंदाणे, विलास जुनागडे, डी. ओ. चौधरी यांनी या खेळाडूंना प्रशिक्षीत केले आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातल्या सहा निशाणेबाजांची निवड
6 years ago
No Comments