भुसावळातील विविध कामांबाबत विधानसभेत आ. सावकारे यांची मागणी

sanjay savkare

भुसावळ प्रतिनिधी । शहराची हद्दवाढ, अमृत योजनेतील रस्ते विकास आणि अन्य कामांसाठी आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेत मागणी केली.

आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेत मतदारसंघातील विविध मागण्या केल्या. ते म्हणाले की, शहरातील विस्तारीत भागांमध्ये हद्दवाढ करणे आवश्यक आहे. हद्दवाढ नसल्याने या भागातील नागरिकांना सेवासुविधा पुरवता येत नाहीत. आमदार निधीही नगण्य असल्याने या निधीतून पुरेशा सुविधा मिळत नाहीत. हा भाग पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाल्यास प्रश्‍न सुटू शकेल. यासंदर्भात भुसावळ पालिकेने हद्दवाढीचा वाढीव प्रस्ताव नगरविकास विभागाकडे दिला होता. मात्र हा प्रस्ताव अधिक क्षेत्रफळाचा असल्याने तो कमी करुन सुधारित प्रस्ताव द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या होता. पालिकेने तत्काळ क्षेत्रफळ कमी करुन सुधारित प्रस्ताव दिला. मात्र नगररचना विभागाने तीन महिने हा प्रस्ताव ठेवून नंतर पून्हा तो वाढवून द्यावा, अशी सूचना केली. अर्थात या विभागाकडून हद्दवाढीसाठी केवळ टोलवाटोलवी होत आहे, यामुळे या विभागावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार संजय सावकारे यांनी याप्रसंगी केली.

आ. सावकारे यांनी अमृत योजनेचाही विषय मांडला. ते म्हणाले की, जेथे अमृत योजनेचे काम सुरु आहे. तेथे पाईप लाईन टाकून झाल्या नंतर रस्ते खराब होतात. अमृत योजनेचे काम झाल्या शिवाय रस्ते दुरुस्ती करण्यात येवू नये असे परिपत्रक आहे. या योजनेला पुर्ण व्हायला दिड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रस्ते इतका काळ थांबवता येणार नाही. यामुळे नगरविकास मंत्र्यांनी शासकीय परिपत्रकात तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी त्यांनी केली. तर सातपुड्यातुन लाकडांची तस्करी होत असल्याचा मुद्दादेखील त्यांनी उपस्थित केला.

Protected Content