Home प्रशासन भडगाव पीक संरक्षक संस्थेच्या चेअरमन पदी रमेश पाटील यांची निवड

भडगाव पीक संरक्षक संस्थेच्या चेअरमन पदी रमेश पाटील यांची निवड


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पीक संरक्षक संस्थेच्या नवीन संचालक मंडळ 2023 ते 2028 कालावधीसाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली. या निवडीत संचालक मंडळातून आज दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी चेअरमन पदी रमेश पांडुरंग पाटील भदाणे तर व्हाईस चेअरमन पदी जयंतीलाल हिरालाल परदेशी यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी एस डी पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी  म्हणून काम पाहिले.  संस्थेचे मार्गदर्शक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रदीप गुलाबराव पवार यांचे मार्गदर्शनात खेडीमेडीच्या वातावरणात पार पडली यावेळी नवनियुक्त संचालक नथा भिवा अहिरे, भाऊसाहेब तुळशीराम पाटील, राजेंद्र धनराज महाजन, सुनील वीरभान शिंदे, श्रावण भिका भोई, बळीराम नामदेव महाजन, मुकुंदा अर्जुन वाघ, शेख राफीउद्दीन शेख रेहमान, संचालिका शांताबाई विठ्ठल मराठे, अरुस्तल बाई बाबुराव पाटील, सचिव प्रवीण राजेंद्र पाटील, शिपाई लक्ष्मण पाटील, शिवाजी पाटील उपस्थित होते.

नवनियुक्त चेअरमन. व्हा. चेअरमन व संचालक मंडळाचे काॅग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार, भाजप विधानसभा निवडणुक प्रमुख अमोल शिंदे, कृउबा संचालक प्रशांत पवार, भाजप तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, मनोहर चौधरी, परशुराम पेंटर पाटील, युवराज पाटील यांच्या सह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.


Protected Content

Play sound