शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनरल सेक्रेटरीपदी राज सिंग छाबरा याची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. महाविद्यालयाच्या जनरल सेक्रेटरीपदी राज सिंग छाबरा याची निवड करण्यात आली आहे. नवीन पदाधिकाऱ्यांना अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी नियुक्ती प्रमाणपत्र देत शपथ दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेची कार्यकारिणी गठीत होत असते. यंदा २०२४-२५ ची विद्यार्थी परिषदेची कार्यकारिणी पदवीपूर्व उप अधिष्ठाता डॉ.किशोर इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली. यामध्ये जनरल सेक्रेटरी (जी.एस.)पदी राज सिंग छाब्रा याची एकमताने निवड झाली. याशिवाय सांस्कृतिक सचिव म्हणून राजसिंग छाबरा, जयेश दाभाडे, श्रावणी जाधव, राजश्री राठोड, क्रीडा सचिव म्हणून कृष्णकांत ढगे, ऋषिकेश शिंदे, मृणाली पाटील, मीनाक्षी मीना, संशोधन विभाग सचिव म्हणून हर्ष कुमार, प्रभंजन सरोळकर, सोनल पाटील, सेजल तळेले, अकॅडमी सचिव म्हणून डॉ. भावेश खडके, डॉ. शाहिद हमीद, डॉ. बिंदूश्री राजेश, हनिफा मोमीन, वरद पाटील, शर्वरी राजपूत, तारीक खान, अंकुश शर्मा, विश्वस्त म्हणून पंकज शेजोळे, श्रद्धा साळवे यांची निवड करण्यात आली आहे.

सर्व नवीन कार्यकारिणीला अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर यांनी नियुक्तीचे प्रमाणपत्र दिले. तसेच शपथ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले (पदवीपूर्व), उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे (पदव्युत्तर), डॉ. गिरीश ठाकरे, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. बाळासाहेब सुरोसे आदी उपस्थित होते.

Protected Content