जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयोजित केलेल्या विनू मांकड करंडक स्पर्धेसाठी निरज जोशीची अंडर-19 महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे.
4 ऑक्टोबर 2024 पासून कटक, ओडिशा येथे सामने होणार आहेत. नीरज जोशी हा खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या आय एम आर महाविद्यालय येथे बीबीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे.
नीरजच्या या यशाबद्दल के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष माननीय नंदकुमार बेंडाळे आणि आय एम आर चे संचालक प्रा. डॉ. बी व्ही पवार, डॉ. नीलिमा पाटील, व सर्व प्राध्यापकांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.